सलग सुट्ट्यांना औद्योगिक कर्मचारी महासंघाचा विरोध - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

सलग सुट्ट्यांना औद्योगिक कर्मचारी महासंघाचा विरोधमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा करताना दर शनिवार व रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर झाला. मात्र या निर्णयाला राज्य शासकीय औद्योगिक व औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघाने विरोध केला आहे. शनिवार, रविवार सुट्टीऐवजी रविवारची सुट्टी कायम ठेवत आठवड्यातील इतर दिवशी दुसरी सुट्टी देण्याची मागणी संघाने केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

संघाचे अध्यक्ष अ.द. कुलकर्णी यांनी सांगितले की, शनिवार व रविवारी सर्वच कर्मचार्‍यांना एकत्रित सुट्टी दिल्याने सलग दोन दिवस शासकीय कार्यालये ठप्प पडतील.परिणामी, सोमवारी कर्मचार्‍यावर कामाचा अधिक भार असेल. त्याऐवजी कार्यालयातील कर्मचार्‍यांना रविवारची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी. तसेच एकाच विभागातील कर्मचार्‍यांमध्ये सोमवार ते शुक्रवारदरम्यान सुट्टीचे वाटप करावे.

जेणेकरून शनिवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी असलेल्या नागरिकांना शासकीय कामासाठी सोमवार ते शुक्रवारदरम्यान स्वतंत्र सुट्टी घेण्याची गरज भासणार नाही.

No comments:

Post a Comment