किसान योजनेतील पीककर्ज,बँका राबवणार विशेष मोहीम - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

किसान योजनेतील पीककर्ज,बँका राबवणार विशेष मोहीम


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पीएम किसान योजनेअंतर्गत किसान कार्ड पीक कर्ज घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने अर्ज दाखल करता यावा , यासाठी आयबीए संस्थेमार्फत एक पानी अर्जाचा नमुना बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे . लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणपत्र घेऊन पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या बँकेमध्ये संपर्क साधावा. 

कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेमध्ये पीक कर्ज नसणाऱ्या पीएम किसानलाभार्थी शेतकऱ्यांनाकर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे . राज्य शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येक गाव स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात यावी. 

यासाठी गावस्तरावर तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून संबंधित कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे , अशा सूचनाही देण्यात आल्या. योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता बँक अधिकारी, तलाठी , ग्रामसेवकांनी घेण्याचे आदेश देण्यात आले.
----------
मंगळवेढा टाईम्स
No comments:

Post a Comment