मंगळवेढ्यात दोन गटात हाणामारी,९ जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

मंगळवेढ्यात दोन गटात हाणामारी,९ जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जोरजोराने आरडाओरडा करून आपसात मारामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिरा आगतराव लोखंडे,दादा बिरा लोखंडे,रामेश्वर बिरा लोखंडे (रा.गोणेवाडी,ता.मंगळवेढा),नाथाजी नामदेव कांबळे,विठ्ठल नामदेव कांबळे, सावित्रा नामदेव कांबळे (रा .लेंडवे चिंचाळे,ता. मंगळवेढा) , सतीश तुळशीराम यादव, जयश्री तुळशीराम यादव (रा .महद ता .सांगोला) ,

जनाबाई दिपक रणदिवे (रा .दिघंची,जि . सांगली ) यांनी रविवार दि.१६ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास गोणेवाडी येथे आवताडे वस्ती गोणेवाडी ते लेंडवे चिंचाळे रोडवर सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी पाईप व लाकडी काठी धरून जोरजोराने ओरडून आपसात झुंज मारामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग केला.

याची फिर्याद पो.ना. गजानन पाटील यांनी दिल्याने पोलिसांनी सदर ९ आरोपींविरूध्द भा.दं.वि.स. कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना. येलपले हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment