अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार,मंगळवेढ्यातील एकावर गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Sunday, February 16, 2020

अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार,मंगळवेढ्यातील एकावर गुन्हा दाखलमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नोकरीनिमित्त आईवडील बाहेर गेल्याची संधी साधून जबरदस्तीने घरी प्रवेश करून अल्पवयीन मुलीस फेसबुकवर अकाउंट उघडायला लावले. त्यावरून जवळीक साधत शाळकरी मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र मैत्रिणींना दाखवण्याची धमकी देत पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना सांगोला येथे घडली आहे.
याप्रकरणी सुधीर राजेंद्र कोकरे (रा. ब्रह्मपुरी, सध्या सांगोला) याच्यावर सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी सुधीर कोकरे याने अल्पवयीन मुलीस काहीही कळत नसल्याचा गैरफायदा घेऊन ऑक्‍टोबर 2019 पासून पीडित मुलीला फेसबुकवर अकाऊंट उघडायला लावले होते.

या अकाउंटवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती स्वीकारायला लावली. पीडित अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि विश्‍वासात घेऊन तिचे आक्षेपार्ह छायाचित्र स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतले.
आक्षेपार्ह छायाचित्र पालकांना व पीडित मुलीच्या मैत्रिणींना दाखवून समाजात तिची बदनामी करण्याची धमकी देऊन 23 जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास मुलीच्या घरी येऊन पीडित मुलीची इच्छा नसताना तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपी कोकरे याने पुन्हा 5 व 7 फेब्रुवारीला घरात मुलीचे आईवडील नसताना येऊन पीडित मुलीस तिचे काढलेले लज्जा वाटेल असे छायचित्र दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीने त्याला प्रखर विरोध केला असता कोकरे हा तुला बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेला.

सुधीर कोकरे याच्याविरोधात सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हुले करत आहेत.

No comments:

Post a Comment