मंगळवेढ्यातील अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

मंगळवेढ्यातील अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अज्ञात कारणातून अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद मुलाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील सौरभ संतोष साखरे (वय १७ वर्षे १० महिने रा.भाळवणी ता.मंगळवेढा) हा १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास भाळवणी येथील राहत्या घरातून त्याच्या पँटला चेन बसवून आणतो असे सांगून गेला तो परत आला नाही.

तसेच आपल्या कायदेशीर रखवालेतून त्याला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले अशी फिर्याद त्याचे वडील संतोष साखरे यांनी दिली.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भा.दं.वि.३६३ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत.

दरम्यान अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा सौरभ साखरे हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.

----------------

मंगळवेढा टाईम्स

No comments:

Post a Comment