प्रवेश परीक्षा(सीईटी) अर्ज प्रक्रिया सुरु;29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत - Mangalwedha Times

Breaking

Sunday, February 16, 2020

प्रवेश परीक्षा(सीईटी) अर्ज प्रक्रिया सुरु;29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदतमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत 29 फेब्रुवारीपर्यंत आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाईनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना "एमएचटी-सीईटी' परीक्षेला बसता येईल.

फी -
१) "एमएचटी-सीईटी' परीक्षेचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
"पीसीएम' आणि "पीसीबी' या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्यांना स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाणार आहे.

२ ) पीसीबी किंवा पीसीएम यापैकी कोणत्याही एका ग्रुपमधून परीक्षा देत असताना खुल्या गटासाठी 800 रुपये तर, आरक्षित गटासाठी 600 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

३) जर विद्यार्थी दोन्ही गटातील अभ्यासक्रमाची परीक्षा देणार असेल, तर खुल्या गटासाठी 1 हजार 600 रुपये तर आरक्षित गटासाठी 1 हजार 200 रुपये शुल्क आकारले जाईल.

No comments:

Post a Comment